News Flash

लिंगनूर येथे तरूणाला मारहाण…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : लिंगनूर (ता.गडहिंग्लज) येथील वैभव हॉटेल येथे रागामध्ये फारूख गुलाब मुल्लाणी (वय २६) याच्या डोक्यात सोडयाची बाटली मारून जखमी केले. या प्रकरणी संदीप गुंडप (रा.कडगांव) याच्या विरोधात गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी सुनिल खांडेकर, रुपेश चोथे, अजित चोथे हे जेवणासाठी गेले होते. तेथे आरोपीने तुम्हाला मस्ती आली आहे का, म्हणत मित्रांना शिवीगाळ केली. तसेच फारूक मुल्लाणी याच्या डोक्यात सोडयाची बाटली मारून जखमी केले. या प्रकरणी संदीप गुंडप याच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास गडहिंग्लज पोलिस करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!