News Flash

मुगळीत लक्ष्मीच्या पुजाऱ्यास मारहाण…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुगळी (ता.गडहिंग्लज) येथील लक्ष्मी मंदीराची पूजाअर्चा करण्याच्या कारणावरून बाळू लक्ष्मण कुंभार (वय४५), मारूती जोती धनवडे (रा.मुगळी) यांना मारहाण केल्याप्रकरणी बाळू कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश उर्फ हणमंत पराप्पा आरबोळे आणि सोमगोंडा उर्फ बाबासाहेब पराप्पा आरबोळे दोघेही (रा.मुगळी) यांच्या विरोधात गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवार (दि.१७) बाळू कुंभार गावातील लक्ष्मी मंदीरात पूजाअर्चा करण्यासाठी गेले असता आरोपींनी तुझा मंदीराची पूजा करणेचा कालावधी संपला असून मंदीराच्या चाव्या दे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्यानी मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी गेलेले मारूती धनवडेस ढकलून दिले. त्यामुळे धनवडे यांच्या पायाला जखम झाली. तसेच फिर्यादी रविवार (दि.१८) नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करण्यास जात असताना मंदीरात जायाचे नाही, असे म्हणत मंदीराचे दरवाज्याचे नुकसान केले. या दोघांविरोधात गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास गडहिंग्लज पोलिस करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!