News Flash

बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांनी घडवली अद्दल…

कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरातील अल्पवयीन मुले-मुली यांच्या बेदकारपणे चालवत असलेल्या दूचाकीमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. आज (बुधवार) कोल्हापुरातील सर्वच गल्यांच्या कोपऱ्यांवर उभारून ट्राफिकचे नियम तोडणाऱ्या, आणि वन वे तोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत चांगलीच अद्दल घडवली आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत अल्पवयीनांचे होणारे दुचाकी अपघात रोखण्यासाठी धडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. यानुसार वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी शहरातील चौका-चौकात पोलिसांनी वाहनांची तपासणीबरोबरच अधिकृत कागदपत्रांची मागणी करत दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. ज्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई झाली होती त्या वाहन चालकांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये गर्दी केली होती.

आज येथील गल्ली गल्ली च्या कोपऱ्यावर वाहतुक पोलिसांनी थांबून नियम तोडणार्यांव दंडात्मक कारवाई करत बेशिस्थ वाहतुकीला चाप लावला आहे. ज्या ठीकाणी वाहतूक पोलीस थांबत नाहीत त्याच ठिकाणी त्यांना अचानक तेथे पाहून वाहनचालक गल्ली-बोळातून मार्ग काढत धूम ठोकत होते.

दरम्यान, शहरामध्ये अल्पवयीन दुचाकीस्वारांची संख्या जास्त आढळून येत आहे. यामुळे वाहन चालवण्याच्या अज्ञानामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पोलिसांची कारवाई सुरु आहे. दिवसभरात साडे तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. तसेच अल्पवयीन मुलांवर सुद्धा कारवाई केली आहे. शहर आणि जिल्ह्यात पालकांमध्ये जागृती होईपर्यंत अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाई मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!