News Flash

स्वामिनाथन अहवाल फेटाळणारे शरद पवार आता आंदोलन कसे करतात? : माधव भंडारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस – राष्ट्रवादीच्या २००८ सालच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वामिनाथन समितीने सादर केलेला अहवाल फेटाळला. पण तेच शरद पवार आता स्वामिनाथन आयोगाची शिफारस मान्य करण्याबाबत आंदोलनात पुढे असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. ते आज (गुरुवार) कोल्हापुरात बोलत होते. गुढी पाढव्यादिवशी शिवतीर्थावर येथे मनसेच्या झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘भाजपमुक्त भारत’चा नारा दिला त्या राज ठाकरेंचा मुंबई महापालिकेत साधा एक नगरसेवकही नाही. त्यामुळे त्यांनी असले विनोद करत फिरू नये, अशी खरमरीत टीकाही भंडारी यांनी केली. भाजपच्या स्थापनादिनानिमित्त मुंबई येथे भाजपा महामेळावा होणार आहे याची माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

          या वेळी भंडारी म्हणाले की, स्वामिनाथन आयोग समिती २००२ साली नेमण्यात आली. या समितीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सन २००६ पर्यंत सहा वेगवेगळे अहवाल सदर केले. पण २००८ साली तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना शेतमालाचा हमीभाव देता यात नसल्याचे विधानभवनात सांगितले होते. तेच शरद पवार आता सरकार बदलल्यानंतर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याबाबत आंदोलन करत केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी पवारांवर केली. शिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादन शुल्काच्या दीडपट भाव देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        गुढीपाढव्यादिवशी शिवतीर्थ येथे मनसेच्या झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘भाजपमुक्त भारत’चा नारा दिला त्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात एकही आमदार नाही, खासदार नाही आणि मुंबई महपलिकेत नगरसेवकही नाही अशा नेत्यांनी भाजपमुक्त भारत करण्याचे विनोद सांगत फिरू नये असा टोलाही भंडारी यांनी या वेळी राज ठाकरेंना लगावला.

One thought on “स्वामिनाथन अहवाल फेटाळणारे शरद पवार आता आंदोलन कसे करतात? : माधव भंडारी”

  1. राज ठाकरे यांनी फक्त भाषण करायचे.
    लोकांचे मणोरंजण करायचे.कृती शुन्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!