News Flash

कर्नाटक विधानसभेवर भाजपचाच झेंडा फडकेल : माधव भंडारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी काळात कर्नाटक राज्याच्या निवडणुका होत आहेत. भाजपची घोडदौड पाहता आणि काही सर्वेक्षण संस्थांच्या अहवालानुसार कर्नाटक विधानसभेवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास भाजप मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे भाजपाचा महामेळावा होणार आहे. याची माहिती देण्याकरिता आयोजीत पत्रकार परिषदेत ते आज (बुधवार) बोलत होते.

यावेळी भंडारी म्हणाले की, भाजपा हा पक्ष स्थापन केल्यापासून इतर पक्षांचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. शिवाय यावेळी त्यांनी कोणत्याही पक्षावर टीका न करता आम्ही विरोधी पक्षांकडे एक स्पर्धक म्हणून पाहतो. त्यामुळे कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसला एका स्पर्धकाप्रमाणे जरी पाहत असलो, तरी सर्वेक्षण संस्थांनी या विधानसभेचा कौल आधीच जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपाची लोकप्रियता पाहता कर्नाटकात काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचा, विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये भाजपाचा महामेळावा होणार आहे. त्याची आता राज्यातील विविध भागात तयारी झाली आहे. या मेळाव्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील लाखो पदाधीकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे. त्यासाठी कोल्हापूरहून हजारोंच्या संख्येने या महामेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!