News Flash

अकिवाट येथील वसंत गायकवाड यांना डॉक्टरेट पदवी…

सैनिक टाकळी (प्रतिनिधी) : अकिवाट (ता.शिरोळ) येथिल वैद्य वसंत रामू गायकवाड यांनी अर्धांग वायूच्या रूग्णांवर केलेल्या यशस्वी औषधोपचारची दखल घेवून आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ या संस्थेच्या वतीने त्यांना डॉक्टररेट पदवी प्रदान करण्यात आली.

सातारा येथे झालेल्या समारंभात चित्रपट निर्माते मधुसूदन घाणेकर आणि डॉ.सुधिर कुलाल या मान्यवरांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली. गायकवाड यांना यापूर्वी अठ्ठावीस पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच माजी सामाजिक व न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!