News Flash

गडहिंग्लजमध्ये दिमाखदार सोहळ्यात हिरण्यकेशी पुरस्कारांचे वितरण

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हिरण्यकेशी फौंडेशन आयोजित ‘गडहिंग्लज गौरव सोहळा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘दगडांच्या देशा’ या दुर्मिळ दगडाचे प्रदर्शन, खवय्यांसाठी ‘व्हेज फूड कार्निव्हल, सांस्कृतिक नृत्याविष्कार, तसेच विविध क्षेत्रातील गुणीजनांचा कार्याचा गौरव हिरण्यकेशी पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न झाला. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पोलीस उपाधीक्षक आर.आर.पाटील, उपनगराध्यक्ष उदय पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सैराट’ फेम (सल्या) व (जब्या) यांचे प्रमुख आकर्षण होते.

     ‘दगडांच्या देशा’ या दुर्मीळ दगडाचे प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार राजेश चव्हाण यांचे हस्ते उद्घाटन झाले. ‘व्हेज फूड कार्निव्हल,सण महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच वृक्षास जलप्रदान करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर हिरण्यकेशी फौंडेशनचे विविध पुरस्कारार्थी असे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर व पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला.  

   या वर्षाचे हिरण्यकेशी गुणवंत पुरस्कारकु.रोहिणी शेवाळे (महागाव) व कु. मयुरी भदगरे (चन्नेकुप्पी) हिरण्यकेशी गुणवंतरत्न पुरस्कारश्री सुरेश पाटील (करंबळी) व बाळकृष्ण खणदाळे (हिटणी) हिरण्यकेशी जिद्द पुरस्कारश्रीमती शोभना जोशी (हलकर्णी), हिरण्यकेशी समाजभूषण पुरस्कारअमित वसंत (पेरणोली) हिरण्यकेशी आर्य कृषक कृषि पुरस्कारविकास गुडसे (हसूरचंपू),  ‘हिरण्यकेशी द्रोणाचार्य पुरस्कारशिवाजी कोंडूसकर (महागाव) यांना व ‘आमचा बाप्पा ईको फ्रेंडली’ या स्पर्धतील घरगुती गणेश सजावट विजेते शैलजा सुतार (नेसरी), महादेव मोरे (वडरगे) सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ विजेते बालगोपाल मंडळ, आझाद तरुण मंडळ यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

      सल्या व जंब्या याला पाहण्यासाठी गडहिंग्लजकरांनी गर्दी केली होती. त्यांनी केलेल्या झिंगाट या गाण्यावर सर्व गडहिंग्लजकर थिरकले. वैद्यकीय अधीक्षक दिलीप आंबोळे, पं.स.उपसभापती बनश्री चौगुले, पं.स.सदस्य श्रेया कोणकेरी, नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, फौंडेशनचे प्रमुख सुनिल चौगुले, कावेरी चौगुले यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!