News Flash

आजऱ्यात २२ अर्ज अपात्र… 

आजरा (प्रतिनिधी) : आजरा नगरपंचायत निवडणुकीकरीता सदस्य पदासाठी तब्बल १३७ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज (मंगळवार) झालेल्या छाननीत २२ अर्ज अपात्र करण्यात आले.

नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर सदस्य पदासाठी १३७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर एकूण १४४ जणांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुक  अधिकारी डॉ.संपत खिलारी यांनी बहुतांश पक्षाचे एबी फॉर्म नसल्याने अर्ज अपात्र केले आहेत. प्रत्येक प्रभागातून १७ प्रभागाची उमेदवारांच्या समोर छाननी करण्यात आली.

प्रभाग पाच आणि सातमध्ये किरकोळ स्वरूपात आक्षेप घेण्यात आले. अन्य प्रभागातून सुरळितपणे छाननी पार पडली. नगराध्यक्षपदासाठी एकूण सात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एकही अर्ज अपात्र ठरला नाही. तर (दि.२६) ला अर्ज माघाराची शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!