News Flash

जाहीर उसदर त्वरित द्या : ‘स्वाभिमानी’तर्फे वारणा कारखान्यास निवेदन

कोडोली (प्रतिनिधी) : जाहीर केलेला उसदर लवकरात लवकर मिळावा, यासाठी आज (मंगळवार) वारणानगर (ता. पन्हाळा) येथील तात्यासाहेब कोरे कारखान्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रतापराव पाटील व प्रभारी अधिकारी संचालक विजयकुमार कोल्हे यां आज (मंगळवार) निवेदन देण्यात आले. 

     सध्याचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी खासदार राजू शेट्टी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हातील साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांची बैठक कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे झाली होती. त्या वेळी एफ.आर.पी. अधिक २०० रु. हा दर देण्याचे ठरले होते. 

     साखर कारखाने सुरु झाल्यानंतर पहिल्या महिन्यातील तोडलेल्या उसाला ठरल्याप्रमाणे साखर कारखान्यांनी दर दिला पण त्यानंतर ठरलेला ऊस दर देण्यास कारखान्यांनी टाळाटाळ केली आहे. काही कारखान्यांनी फेब्रुवारी अखेर २५०० रु अॅडव्हान्स ऊस उत्पादकांना दिले आहेत, पण वारणा साखर कारखान्याने तोही दिलेला नाही. तर ठरलेला ऊस दर शेतकऱ्यांना विनाविलंब लवकरात लवकर मिळावा याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी वैभव कांबळे, शिवाजी माने, आण्णा मगदूम, धनाजी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!