News Flash

कागलमध्ये जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल…

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील गोरंबे येथे घरावर दगडफेक करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चार तरुणासह पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत राजाराम धोंडी कांबळे यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजाराम कांबळे यांचे शेजारी गोविंद कांबळे राहतात. गोविंद यांचा मुलगा साहिल शिक्षणासाठी कोल्हापूरात आहे. त्याने गावातीलच तरूणीशी प्रेमविवाह केला आहे. या रागातूनच योगेश बाबुराव सावंत, योगेश रामचंद वास्कर, एकनाय विठ्ठल कोपार्डे आणि राजू आनंदा जाधव यांच्यासह पंधराजणांनी जातीवाचक शिवीगाळ करून दगडफेक केली.

यामध्ये राजाराम कांबळे, बापू कांबळे यांचे घराचे नुकसान झाले आहे. गोविंद कांबळे यांचे पानाच्या टपरीचे नुकसान करण्यात आले असल्याचे,  फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार पोलीसांनी तिघांना त्याब्यात घेतले असून याचा पुढील तपास करवीरचे विभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!