News Flash

कागलमध्ये बेकायदेशीर लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त…

कागल (प्रतिनिधी) : कागल येथील आंतरराज्य वन तपासणी नाक्यावर बेकायदेशीर लाकडाची वाहतूक करणारा ट्रक आज (मंगळवार) पकडण्यात आला. तसेच ट्रकसह साडेसात लास रुपयांची लाकडेही जप्त करण्यात आली.

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास केए २३ ए ९६०१ हा ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता. हा ट्रक नाक्यासमोरून जात असताना वनपाल व्ही.टी. दाते आणि ए.जी. बिराडे यांना संशय आला. त्यांनी या ट्रकचा पाठलाग करून पकडल्यानंतर त्याच्यात बेकायदेशीर झाडे तोडून त्याची लाकडे विक्रीसाठी नेली जात असल्याचे आढळून आले. या पकडलेल्या ट्रकमध्ये दिड लाख रुपये किमतीची लाकडे आदळून आली. ती कोल्हापूरातील श्री इंडस्ट्रिमध्ये नेली जात होती. करवीरचे वन क्षेत्रपाल पी.एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!