News Flash

कलशारोहणासाठी कोल्हापुरात आलेल्या अजय देवगण – काजोलला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सिनेअभिनेते अजय देवगण आणि त्याची पत्नी काजोल यांनी आज (मंगळवार) श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. एका खास विमानाने त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. अजय देवगण यांच्या मातोश्री यासुद्धा त्यांच्यासमवेत होत्या. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी अंबाबाई मंदिर परिसरात  एकच गर्दी केली होती. 

             त्यानंतर कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी परिसरातील एकमुखी दत्त मंदिराच्या कलशाचा कलशारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी त्यांचे आगमन झाले.  या वेळी ५१ ब्राह्मणांना प्रसाद वाटप आणि ५१ दांपत्यांचे पाद्यपूजन करण्यात आले.  या वेळी भाविकांसह चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!