News Flash

वारणा नदीपात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह मिळाला…

कोडोली (प्रतिनिधी) : चिकुर्डे पूल येथील वारणा नदीपात्रात बुडालेल्या नवविवाहित युवक हाफीज सिद्धीक राजू मुल्ला (कोडोली ता.पन्हाळा) याचा मृतदेह आज (मंगळवार) दुपारी १२ च्या सुमारास आढळून आला. काल (सोमवार) तो पोहण्यासाठी वारणा नदीपात्रात उतरला असताना बुडाला होता.

         हाफीजसिद्धीक मुल्ला याचा  रविवार दिनांक १८ रोजी तासगाव येथे झाला होता. आज स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल (सोमवार) दि. १९ रोजी घरी आलेले पाहुणे आणि कुटुंबीयांनी त्यास घरी थांबण्यास सांगून वारणा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. तर सिध्दिक याने नमाज पढून येतो सांगून तो मोटारसायकल वरून वारणा नदीवर गेला. पोहण्यास पाण्यामध्ये उतरला असता तो बुडाला होता. त्याचा शोध कोल्हापूर येथील जीवन ज्योतचे जवान करत होते. आज सकापासून हाफिज सिध्दिक याला शोधण्याचे मोहीम सुरू होती. आज दुपारी १२ च्या कराड येथील मच्छिमार नतीफ सय्यद, बशीर पठाण आणि समीर पठाण या तिघांनी हाफीजसिद्धीक मुल्ला या तरुणाचा मृतदेह ५ मिनिटात शोधून काढला. या घटनेची नोंद वडगांव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मलगुडे अधिक तपास करत आहेत.

One thought on “वारणा नदीपात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह मिळाला…”

  1. “जीवन ज्योत जवान”

    खूप छान काम आहे तुमचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!