News Flash

प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे रेल रोको आंदोलन मागे

मुंबई (प्रतिनिधी) : रेल्‍वे परीक्षा भरतीमधील गोंधळामुळे संतप्‍त झालेल्‍या विद्यार्थ्यांनी माटुंगा-दादर रेल्‍वे स्‍टेशनदरम्‍यान आज (मंगळवार) सकाळी पासून सुरु केलेले रेल रोको आंदोलन साडेतीन तासानंतर मागे घेतले आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मध्‍य रेल्‍वेची वाहतूक खोळंबली होती. सकाळी नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलनाची वेळेवर दखल न घेतल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. यामुळे दादरहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक तब्बल साडेतीन तास ठप्प होती.

       सकाळी पासून विद्यार्थ्‍यांनी आंदोलन सुरू केले. यादरम्‍यान विद्यार्थ्‍यांना ट्रॅकवरून हटवण्‍यासाठी रेल्‍वे पोलिसांनी लाठीचार्ज केल्‍याने परिस्थिती आणखी चिघळली. यामध्‍ये ते विद्यार्थी जखमी झाल्‍याचे वृत्‍त आहे. संतप्‍त विद्यार्थ्‍यांनीही प्रत्‍युत्‍तर म्‍हणून लोकलवर दगडफेक केली. सुदैवाने यामध्‍ये कोणीही जखमी झाले नाही. विशेष म्‍हणजे आंदोलनाला तास उलटूनही अद्याप रेल्‍वेचा एकही अधिकारी घटनास्‍थळी दाखल झालेला नव्हता. सकाळी १० वाजता रेल्वेचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले. मात्र आंदोलकांनी लेखी आश्वासनाशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली होती.

आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. सकाळी वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. माटुंगा-दादर रेल्वे स्टेशनदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकल, एक्स्प्रेस अडवून ठेवल्या होत्या. आंदोलनामुळे सीएसटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला.  

         दरम्‍यान प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) यांची वेगळी परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय रेल्‍वे भरती बोर्डाने घेतल्‍याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी त्‍यांना ३० मार्चपर्यंत अर्ज करायचा आहे. मात्र अधिकृतपणे रेल्‍वे प्रशासनाने अद्याप अशी घोषणा केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!