News Flash

‘आरबीआय’ने रद्द केली एलओसी-एलओयू सुविधा… 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  अब्जावधीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर केंद्रीय रिझर्व बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे.  या अंतर्गत बँकाकडून आयतीसाठी देण्यात येणारे गॅरंटी पत्र (लेटर ऑफ अंडरटेकिंग) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (एलओसी) जारी करण्याची सुविधा तात्काळ थांबविण्यात आली आहे.  बँकांशी होणाऱ्या फसवणूकीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

काही दिवसांपूर्वी पीएनबीचा १२६०० कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी आरोपी आहेत. ईडी आणि सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत समोर आले की नीरव मोदीने इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा हा एलओयूच्या माध्यमातून केला होता. या पूर्वी अर्थमंत्रालयाने बँकांशी संबधीत कोणत्याही मोठ्या फ्रॉडला वाचविण्यासाठी ५० कोटीपेक्षा अधिक कर्ज घेताना पासपोर्ट संबंधी सर्व माहिती देणे गरजेचे केले आहे. कोणताही गैरव्यवहार झाल्यास त्वरित कारवाई व्हावी यासाठी ही माहिती असणे गरजेचे असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!