News Flash

खुनशी प्रवृत्तीचा बीमोड होत असल्यानेच माजी मंत्र्यांच्या बगलबच्च्यांची कोल्हेकुई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी गृहराज्यमंत्र्यांचे संस्थान खालसा होण्याची चिन्हे दिसू लागल्याने त्यांच्या बगलबच्च्यांनी पालकमंत्र्यांवर बेछूट आरोप करण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक पालकमंत्र्यांनी कसबा बावड्यातील दहशत आणि जहागिरदारी संपवण्याचे आव्हान केले होतेमात्र हे आपल्यालाच  लागू पडते, याची आठवण माजी गृहराज्यमंत्री व त्यांच्या सैनिकांनी करून देऊन जनतेसमोर त्यांचे खरे रूप उघड केले आहे.  त्यांच्या खुनशी प्रवृत्तीचा, जहागिरदारीचा बीमोड होत असल्यानेच बगलबच्च्यांची कोल्हेकुई सुरु आहे, अशी टीका भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकाद्वारे केली आहे.

           पत्रकात म्हटले आहे की, माजी गृहराज्यमंत्र्यांनी देवस्थान जमिनी, महापालिकेच्या जमिनींवर दरोडे घावून सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे. कसबा बावडा येथील काही लोचट आणि संधिसाधू नगरसेवकांनी पालकमंत्री यांच्यावर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखेच आहे. पहिल्या आमदारकीच्या वेळी दादा मला पुरस्कृत करा म्हणून  दादांच्या दारात जाणाऱ्या यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवताना पाच झेंडे गाडीवर लावले होते. त्यामध्ये भाजपचा झेंडा देखील होता, त्यांच्या जिवावरच पहिल्यांदा आमदार झालेल्या या माजी राज्यमंत्र्यांनी नंतर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. नंतर शिरोलीकरांबरोबर राहिले. त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले. नंतर त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला आणि खुनशी राजकारणात सुरुवात केली. गृहराज्यमंत्रीपद मिळाल्यावर सुपाऱ्या देवून कार्य़कर्त्याच्या जीवनाची राखरांगोळी केली.

      पालकमंत्री यांची विचारसरणी अत्यंत उच्च असून त्यांनी कधीही व्यक्तिगत किंवा द्वेषाचे राजकारण केले नाही. प्रत्येक  वेळी सोयीचे राजकारण करत व्यक्तिद्वेष करण्याचे काम माजी गृहराज्यमंत्री यांनी केले आहे. त्यांच्या बगलबच्च्यांनी उत्तुंग व्यक्तिमत्त्वांवर टीका करताना जनाची नाही तर मनाची लाज बाळगणे आवश्यक होते. रस्ते विकास प्रकल्प आणून कोल्हापूरच्या जनतेवर टोल लादला आणि टोलची पहिली पावती स्वतः फाडून आपले कर्तृत्व दाखवून आपण सूर्याजी पिसाळ असल्याचे जनतेला दाखवून दिलेदेशातील २३ राज्यातील दडपशाही व जाहिगिरदारी मोडीत काढण्याचे काम भाजप करत आहे.   पालकमंत्र्यांनी कसबा बावडा येथील  दहशत, दादागिरी, गुंडगिरी मोडण्यासाठी पुढाकार घेतल्याने बगलवच्चे  हादरले आहेत. त्यांना पोटशूळ उठला आहे. त्यातूनच ही कोल्हेकुई सुरू आहे.

या निवेदनावर विजय सूर्यवंशी ( भाजप गटनेता, महापालिका), आशिष ढवळे (स्थायी समिती सभापती) नगरसेवक विजय खाडे,  संतोष गायकवाड,  अजित ठाणेकर यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!