News Flash

‘गडहिंग्लज पूर्व’मधील पाणीप्रश्नी ग्रामस्थांची ‘प्रांत’वर धडक 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागाला मागील दहा वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण विविध राजकीय पक्ष, ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही पाणीप्रश्न सुटला नसल्याने त्रासलेल्या ग्रामस्थांनी आज (मंगळवार) प्रांत कार्यालयावर जि.प.सदस्या रेखाताई हत्तरकी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांना निवेदन सादर करण्यात आले.

    लक्ष्मी देवालयापासून मोर्चास सुरुवात होऊन प्रांत कार्यालयासमोर यांचे सभेत  रुपांतर झाले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. निवेदनात लिंगनूर ओढ़यातून वाहून जाणारे पाणी तेरणी तलावात सोडून पूर्ण भरून घेणे. रामतीर्थ धबधब्यातून पाणी सायफन पद्धतीने आणून ते हलकर्णी परीसराला पाणी उपलब्ध करून द्यावे. संकेश्वर शहरातील सांडपाणी व मोठ्या उद्योगधंद्याचे सांडपाणी हिरण्यकेशी नदीत सोडले जात आहे. ते कायमस्वरूपी थांबवावे, चित्रीचे लाभक्षेत्र वाढवून निलजी बंधारा ते खोत बंधारा दरम्यान करणे. चित्रीची उंची वाढवणे. हिरणी, मुत्नाळ, नांगनूर, कडलगे, अरळगुंडी, इदरगुच्ची, नरेवाडी या गावांना शेतीसाठी व पाण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याचे नियोजन करणे इत्यादी मागण्या केल्या आहेत.

        या वेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, सदानंद हत्तरकी, गंगाधर व्हसकोटी, वरदशंकर वरदापगोळ, बाळेश नाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जि.प.सदस्या रुपाली कांबळे, सदस्य इराप्पा होसुरे, समगोंडा आरबोंळे, बसवराज आजरी व मोठया संख्येने पूर्व भागातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!