News Flash

छत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात सीपीआरएफच्या ८ जवानांचा मृत्यू

सुकमा (वृत्तसंस्था) : मागील वर्षी ११ मार्चला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर मोठा हल्ला होता. यामध्ये ११ जवान हुतात्मा झाले होते. नक्षल्यांनी त्यांच्या मृतदेहांची विटंबना करीत शस्त्रेही लुटून नेली होती. आज (मंगळवारी) बरोबर एक वर्षानंतर सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम भागामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरफीएफच्या  २१२व्या बटालियनवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये ८ जवान शहीद झाले आहेत. मृत जवानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम भागामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरफीएफच्या  २१२ व्या बटालियनवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये ८ जवान शहीद झाले आहे. त्यानंतर सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली असून यात ६ जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी राजपूर येथे पाठवण्यात आले आहे.  छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंग यांनी सोमवारी दुचाकीवरून नक्षलग्रस्त भागाचा दौरा केला होता. त्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.

सुकमा जिल्ह्यातील भेज्जी भागातील एलारमडुगु आणि वीरभट्टी गावांमधील २९ नक्षलवाद्यांनी ८ मार्चला आत्मसमर्पण केले होते. यामध्ये ११ महिलांचाही समावेश होता. याच गावामध्ये १८ फेब्रुवारीला झालेल्या चकमकीमध्ये २० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीदरम्यान २ जवानही शहीद झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!