News Flash

पन्हाळा तालुक्यात ‘एक घर-एक पुस्तक’ अभियानाद्वारे २१३२ पुस्तके जमा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागांमध्ये ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी पन्हाळा तालुक्यातील काही तरुणांनी पुढाकार घेऊन एक घर-एक पुस्तक अभियान सुरू केले. या तरुणांनी प्रत्येक घरापाठीमागे एक पुस्तक जमा करण्याचा ध्यास घेतला. त्यातून काही आठवड्यात २१३२ पुस्तके जमा झालीत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्य, दलित साहित्य व समीक्षा, कथा-कादंबरी, काव्य, बालसाहित्य आणि महानुभव संप्रदायावरील दुर्मीळ पुस्तके, हस्तलिखिते, मासिके अशी विपुल साहित्यसंपदा जमा झाली. डॉ. दीपक चव्हाण, उमाताई पानसरे, अमोलदादा मिठकरी यांनी पुस्तके देऊन या अभियानास शुभेच्छा दिल्या.

        या अभियानातून छ. राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय, पिंपळे तर्फ सातवे (बांबरवाडी), माजी सहायक फौजदार श्री. कल्लाप्पा चव्हाण, महानुभाव आणि संत वाङमय दालन, ऐतिहासिक संदर्भ साधन ग्रंथालय आदी ग्रंथालयांची उभारणी केली जाणार आहे. या व्यतिरिक्त पन्हाळा आणि पन्हाळा परिसरामध्ये आणखी काही ग्रंथालयाची निर्मिती करण्याचा मानस आहे अशी माहिती एक घर -एक पुस्तक या अभियानाचे समन्वयक शिवप्रसाद शेवाळे यांनी दिली. या अभियानात अमोल पांढरे, दक्षता तेलंगे, स्वप्नील पाटील, राजू शेख, अक्षय सावंत, राहूल पाटील, अनिकेत पाटील आदी कार्यकर्ते सहभागी असून त्यांनी पुस्तके आणि फर्निचरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!