News Flash

कोल्हापूरला समस्यामुक्त करण्यासाठी वाहतूक मंत्रालयाकडून सर्वतोपरी मदत : नितीन गडकरी

कोल्हापूर : महानगरपालिकेतील भाजपताराराणी आघाडीचे नगरसेवक सध्या दिल्ली अभ्यास गेले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी आज (सोमवार) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या वेळी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे बळकटीकरण, शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे रखडलेले काम आणि कोल्हापूर शहरात नवे उड्डाणपू बांधण्याबाबत चर्चा झाली. नामदार गडकरी यांनी, कोल्हापूर शहराला समस्यामुक्त करण्यासाठी आपला विभाग सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.

भाजपताराराणी आघाडीतील सुमारे ३० नगरसेवक दिल्ली दौऱ्यावर गेले असून, आज या नगरसेवकांनी संसदेचे कामकाज पाहण्यासाठी संसदेत उपस्थिती लावली. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या नगरसेवकांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतू मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. केएमटीच्या माध्यमातून सार्वजनिक प्रवासी वाहतू सध्या सुरू आहे. मात्र बदलत्या काळानुसार परिवहन विभागाला पर्यावरणपूरक आणि कमी खर्चाच्या बसेस उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली. नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेला इलेक्ट्रीक बसेस किंवा इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्यावर कोल्हापूर महानगरपालिकेने राज्य शासनामार्फत ५० इलेक्ट्रीक बसेस मागणीचा प्रस्ताव द्यावा, त्याला तत्काळ अनुमती देवू अशी ग्वाही नामदार गडकरी यांनी दिली. या बसेस महापालिकेला संपूर्ण मोफत मिळतील. केवळ दररोज ठराविक किलोमीटर बसेस धावतील, याची ग्वाही देवून, ठरलेल्या प्रति किलोमीटर दरानुसार बस पुरवठा करणार्या कंपनीला पैसे अदा करावेत, अशी संकल्पना नामदार गडकरी यांनी मांडली. या बसेसच्या चालकांचा, देखभाल दुरूस्तीचा खर्चही महापालिकेला करावा लागणार नाही. तसेच इथेनॉलवर चालणार्या बसेस देण्यासही गडकरी यांनी संमती दर्शवली.

तावडे हॉटेल ते रत्नागिरीकडे जाणारा रस्ता या मार्गावर नवा प्रशस्त उड्डाण पुल बांधावा, अशी मागणी गडकरी यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला गडकरी यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. तर शिवाजी पुलाला पर्यायी पूल बांधण्याचे काम जूनही रखडले असल्याचे नामदार गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. पुरातत्व खात्याच्या कायद्यामध्ये बदल होण्यासाठी लोकसभेत मंजुरी झाली आहे, मात्र राज्यसभेत अद्यापही या विधेयकाला मंजुरी मिळालेली नाही. याबाबत तोडगा काढण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना सोबत घे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घे, असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!