News Flash

‘सपा’चे बडे नेते नरेश अग्रवाल भाजपमध्ये : अखिलेश यादवांना झटका

लखनऊ  (वृत्तसंस्था) : नेहमी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट भाषेत टीका करणारे समाजवादी पक्षाचे बडे नेते, खा. नरेश अग्रवाल यांनी चक्क भाजपाच्या गोटात जाणे पसंत केले आहे. आज (सोमवार) त्यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल, प्रवक्ते डॉ. संबीत पात्रा यांच्यासह विविध ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थिती पक्षात प्रवेश केला. नरेश अग्रवाल यांच्याऐवजी समाजवादी पक्षाने जया बच्चन यांना उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केल्याने नाराज अग्रवाल यांनी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हा अखिलेश यादव यांना झटका मानला जात आहे.

            २ एप्रिल रोजी अग्रवाल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. समाजवादी पक्षाने अग्रवाल यांना पुन्हा उमेदवारी डावलून जया बच्चन यांना दिली. त्यामुळे अग्रवाल नाराज झाले. अग्रवाल यांनी आरोप केला, की सपामध्ये चित्रपटात काम करणाऱ्यांना तिकीट दिले जाते परंतू पक्षात काम करणाऱ्याचे तिकीट कापले जाते. चित्रपटांत नाचणाऱ्यांसोबत माझी तुलना केली गेली. मुलायमसिंह आणि रामगोपाल यादव यांच्या संपर्कात राहील. मात्र यापुढे सपाचा सदस्य राहाणार नाही. कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. माझा विचार आहे की राष्ट्रीय पक्षात राहिलो नाही तर राष्ट्राची सेवा करता येणार नाही. त्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालो आहे. सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावरुन पंतप्रधानांच्या सोबत असले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!