News Flash

काठमांडू एअरपोर्टनजीक विमान कोसळून ५० जणांचा मृत्यू

काठमांडू (वृत्तसंस्था) : यूएस- बांगलादेश एअरलाइन्सचे विमान आज (सोमवारी) दुपारी अडीचच्या सुमारास नेपाळमधील काठमांडूजवळ कोसळून सुमारे ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १७ जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे. विमान धावपट्टीवर उतरविताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.  

यूएस- बांगला एअरलाइन्सचे विमान सोमवारी दुपारी काठमांडूमधील त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगच्या तयारीत होते. विमान ढाकावरुन काठमांडूला परतत होते. विमानात ६७ प्रवासी आणि ४ कॅबिन क्रू सदस्य आहेत. यात ३७ पुरुष, २७ महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. लँडिंगच्या दरम्यान विमान धावपट्टीवरुन घसरले आणि लगतच्या फुटबॉल मैदानात कोसळले. अवघ्या काही क्षणातच विमानाने पेट घेतला. यावेळी पन्नास जणांचा मृत्यू झाला तर आपातकालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत १७ प्रवाशांची सुटका केली. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेपाळ सैन्य आणि त्रिभुवनदास विमानतळावरील आपातकालील पथकाचे जवान घटनास्थळी मदतकार्य करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!