News Flash

बळीराजापुढे झुकले सरकार : सर्व मागण्या केल्या मान्य

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या झेंड्याखाली एकत्रित येत नाशिकहून मुंबईतील विधानभवनावर धडक मारलेल्या बळीराजाच्या आंदोलनाला यश आलंय. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि मंत्रिगट यांच्यातील बैठक आज (सोमवार) साधारणत: चारच्या सुमारास संपली. शेतकऱ्यांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य केल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच याबाबत त्यांना लेखी आश्वासनही देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आंदोलन मागे घेतले जाणार आहे.

         विनाअट कर्जमाफीची प्रमुख मागणी आणि इतर अनेक मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा हा मोर्चा काढण्यात आला. रविवारी रात्रीच आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर पोहचले होते. या मोर्चाला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस अजित नवले या मोर्चात सहभागी झाले होते.

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. दुपारी १ च्या सुमारास मंत्रिगटासोबत चर्चेला सुरुवात झाली. मंत्रिगटात मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा समावेश होता. वन जमिनीबाबत सहा महिन्यांच्या आत निर्णय घेणार, जीर्ण झालेले रेशन कार्ड तीन ते सहा महिन्यात बदलून देणार,  आदिवासी भागात रेशन कार्ड महिन्यात बदलून मिळणार,  अन्य भागांत  सहा महिन्यात मिळणार, वन हक्क कायद्याखलील अपात्र दावे पुढच्या महिन्यात निकाली करणार, अपात्र प्रकरणे पुन्हा तपासणार, २००६ पूर्वी जितकी जागा असेल ती परत देऊ, गहाळ झाल्याचा पुरावा असेल तर तोही ग्राह्य धरू असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!