News Flash

राज्यसभेसाठी विजया रहाटकर भाजपच्या चौथ्या उमेदवार…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातून पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या राज्यसभेसाठी सहा जागांसाठी भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या रूपाने आपला चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

आज (सोमवार) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर राज्यसभेची बिनविरोध निवडणूक ढळणार आहे. दरम्यान, पक्षाच्या एखाद्या उमेदवाराचा अर्ज रद्दबादल ठरू नये म्हणून खबरदारीचा उपाय रहाटकर यांचा अर्ज दाखल केल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पुढील तीन तासात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

भाजपने यापूर्वीच नारायण राणे, प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेतील सदस्य संख्याबळानुसार भाजपचे तीनच उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने आता चौथा उमेदवार दिला आहे. तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी १-१ उमेदवार निवडून येऊ शकतो. यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांना संधी दिली आहे तर, शिवसेना व राष्ट्रवादीने आपापले विद्यमान खासदार अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांना रिंगणात उतरवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!