News Flash

आमदार मुश्रीफांचा वाढदिवस ‘लोकोत्सव’ करूया : भैया माने

कागल (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे आणि वंचितांचे नेते आहेत. त्यांचा ६४ वा वाढदिवस विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन खऱ्या अर्थाने लोकोत्सव म्हणून साजरा करुया, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. कागल येथे आमदार मुश्रीफांच्या वाढदिवस नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कागलच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी होत्या.

माने म्हणाले की, आमदार हसन मुश्रीफ हे ५१ व्या वाढदिवसानंतर तब्बल १४ वर्षांनी  वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी रामनवमी दिवशी २५ मार्च रोजी सकाळी ते दुपारी २ पर्यंत व त्यानंतर गडहिंग्लजमध्ये उपलब्ध असणार आहेत. या वाढदिनी कागल, मुरगूड, गडहिंग्लज व उत्तूर या शहरांसह कागल विधानसभा मतदारसंघातील सर्व म्हणजे १२६ गावांमध्ये मंदिरे, पुतळे, स्मारके, अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये व चौक या सारख्या सार्वजनिक जागांची स्वच्छता करुया. तसेच गावागावामध्ये रक्तदान, आरोग्यविषयक शिबिरे, रुग्णांना फळे वाटप, नविन विकास कामांचे प्रारंभ व पूर्ण झालेल्या विकासकामांची उद्घाटने असे समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करुन हा वाढदिवस साजरा करुया.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मुश्रीफांकडे भांडवलदार नाहीत पण सर्वसामान्य स्वाभिमानी जनताच त्यांचे खरे भांडवल आहे, त्यामुळे सर्वसामान्य रयतेचा स्वाभिमान जिवंत राहिला पाहिजे.  विकास पाटील- कुरुकलीकर यांनी स्वागत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी प्रास्ताविक केले. या शेतकरी संघाचे चेअरमन युवराज पाटील, बिद्रीचे संचालक गणपतराव फराकटे, बाजार समिती सभापती कृष्णात पाटील, पंचायत समिती उपसभापती रमेश तोडकर, कागल उपनराध्यक्ष प्रविण काळबर, जि. प. सदस्य मनोज फराकटे, दलितमित्र प्रा. डी. डी. चौगले, दिनकर कोतेकर, दत्ता पाटील केनवडेकर, पै. रविंद्र पाटील, बिद्रीचे संचालक प्रविण भोसले, विकास पाटील- कुरुकलीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. विशाल बेलवळेकर यांनी सूत्रसंचलन, बिद्रीचे संचालक प्रविणसिंह भोसले यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!