News Flash

कोल्हापुरातील एकमुखी दत्त मंदिराच्या कळसारोहणासाठी अजय देवगण-काजोल राहणार उपस्थित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील मिरजकर परिसरातील एकमुखी दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंगळवार दि. २० मार्च रोजी कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. सिनेअभिनेते अजय देवगण आणि त्यांची पत्नी अभिनेत्री काजोल या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दि. १८ मार्च रोजी श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रगत दिनाचे औचित्य साधून स्वामी हवन, दत्तयाग करण्यात येणार आहे. २० मार्च रोजी अजय देवगण आणि काजोल यांच्या उपस्थितीत मुख्य कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

One thought on “कोल्हापुरातील एकमुखी दत्त मंदिराच्या कळसारोहणासाठी अजय देवगण-काजोल राहणार उपस्थित”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!