News Flash

सायबर चौक ते कळंबा फिल्टर हाऊस मार्गाला खा. मंडलिक यांचे नाव…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकनेते माजी खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीपित्यर्थ सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ, कळंबा फिल्टर हाऊस या मार्गाला लोकनेते माजी खा. सदाशिवराव मंडलिक मार्ग असे नामाकरण करण्यात आज (रविवार) आले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व सदस्यांनी सर्वांनुमते मंडलिक यांचे नाव सायबर चौक ते शिवाजी पुतळा, कळंबा फिल्टर हाऊस मार्गाला देण्याचे मंजूर केले. त्यानुसार आज दुपारी चारच्या सुमारास माजी जलसंपदा मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नामकरणाची कोनशीला अनावरण सोहळा पार पडला.

या अनावरण सोहळ्यास महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनिल पाटील, माजी महापौर आर.के.पवार, डॉ.संदिप नेजदार, नियाज खान, राहुल चव्हाण, उत्तम कांबळे, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, मारुतराव कातवरे आदींसह जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!