News Flash

सरकारमध्ये मला मरू देण्याची हिंमत नाही : आण्णा हजारे

राळेगणसिद्धी (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी परिवारासह देशाला गरज आहे. त्यामुळेअण्णांनी वाढते वय आणि विविध व्याधींचा विचार करता नवी दिल्ली येथे उपोषण न करता काही तरी वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करावेअसा भावनिक आग्रह राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेत ग्रामस्थांनी अण्णांकडे धरला. त्यावर उपोषणाने मी मरणार नाही अन् सरकारमध्ये मला मरू देण्याची हिमंत नाहीअसे सांगत अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवला

नवी दिल्ली येथील लोकपालशेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा यावेळी आण्णा हजारे म्हणाले कीशेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने गेल्या वीस वर्षांत देशात लाखो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण जास्त असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रश्न दिसून येतो. शेतक-यांना ६० वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळायला हवे. लोकपाल कायद्याची अमंलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केले असून हा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न केला हे, असा आरोपही ण्णांनी केला.

यावेळी सरपंच रोहिणी गाजरेउपसरपंच लाभेश औटीगंगाभाऊ मापारीसुरेश पठारेदादा पठारे,डॉ. धनंजय पोटेशरद मापारीजयसिंग मापारीराजाराम गाजरेअरूण भालेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!