News Flash

विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला पाचवे स्थान…

इपोह (वृत्तसंस्था) : भारतीय पुरुष हॉकी संघाने अझलान शाह हॉकी स्पर्धेत आयर्लंडचा ४-१ ने पराभव केला. या आधीच्या खराब कामगिरीमुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. काल आयर्लंडने भारताला ३-२ असा पराभवाचा धक्का दिला होता. आजच्या विजयामुळे हिशेब चुकता झाला.

भारताकडून वरुण कुमार याने दोन गोल केले. शीलानंद लाक्राने २८ व्या, तसेच गुरजंतसिंग याने ३७ व्या मिनिटाला एकेक गोल केला. आयर्लंडकडून एकमेव गोल ४८ व्या मिनिटाला ज्युलियन डेल याने नोंदविला. भारताने सुरुवात झकास केली. पाचव्या मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. एक पेनल्टी कॉर्नर वाया गेला. पण दुस-या पेनल्टी कॉर्नरवर वरुणने संघाचे खाते उघडले.

दुस-या सत्रात भारताने आक्रमक खेळ करत २८ व्या मिनिटाला शीलानंदने प्रतिस्पर्धी गोलकीपरला चकवित आघाडी दुप्पट केली. ३२ व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळालात्यावर वरुणने दमदार ड्रॅगफ्लिक करीत आघाडी ३-० अशी केली. गुरजंतने ३७ व्या मिनिटाला चौथा गोल केला. सिमरनजितसिंगच्या सुरेख पासवर तलविंदरने चेंडू गुरजंतकडे दिला. त्यावर पंजाबच्या युवा स्ट्रायकरने चेंडू अलगद गोलजाळीत ढकलला. ४८ आणि ५० व्या मिनिटांना भारताने संधी गमाविली नसती तर विजयाचे अंतर आणखी मोठे झाले असते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!