News Flash

चंदगडमध्ये एसटीचा ताबा सुटल्याने एकाचा मृत्यू…

आजरा (प्रतिनिधी) : चंदगड एसटी डेपोतून बस बाहेर येताना त्याच्यावरील ताबा सुटला. त्यामुळे ती बस थेट समोर असलेल्या शेडमध्ये घुसली. यामध्ये एकचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

एसटी चालक सादिक मदार हे बस क्रमांक एमएच १४ ४८६५  ही गाडी आज (रविवार) चंदगडहून कोल्हापूरला जाण्यास बाहेर पडले होते. डेपोतून बाहेर पडल्यानंतर लगेचच या गाडीचा ताबा सुटला आणि गाडी शेडमध्ये घुसली. यामध्ये अर्जुन पाटील हे जागीच मयत झाले असून गणपत कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. कांबळे यांना बेळगाव येथील केएलई  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!