News Flash

सकारात्मक दृष्टीकोन हाच सुखी जीवनाचा मार्ग : प्राचार्य श्रीधर हेरवाडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  निरोगी मन हीच निरोगी शरीराची गुरुकिल्ली असते. ज्येष्ठांनी आपल्या उतरत्या वयात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तरच आपले पुढील जीवन सुखी होईल असे प्रतिपादन प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी केले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया (जी.एस.आय.) कोल्हापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर मध्ये सुरु केलेल्या ज्येष्ठ नागरिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आपल्या आयुष्यातील सेकंड इनिंग मध्ये अल्प आहार,विपूल विहार,विशुद्ध विचार आणि निर्मळ आचार ही निरोगी जीवनाची चतुः सूत्री जोपासली पाहिजे. जैसे खावे तैसा होगा मन यामुळे तामसी आहार टाळून सात्विक आहार केल्यास सतप्रवृत्तीची भावना निर्माण होते.  उदात्त विचाराने जेरियाट्रिक सोसायटी अँड इंडिया (जी.एस.आय.)कोल्हापूर शाखा व कोल्हापूरातील डॉक्टरांची शिखरसंस्था असणारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (के.एम.ए) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरीकांसाठी मेडिकल असोसिएशनच्या हाऊस मध्ये हे  आरोग्य केंद्र सुरु करीत असल्याचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शिंदे आणि जेरीयाट्रिक सोसायटी चे अध्यक्ष डॉ. आनंद कामत यांनी सांगितले.

हे आरोग्य केंद्र दर शुक्रवारी 4 ते 6 या वेळात सुरु राहणार आहे. या वेळात डॉक्टर ज्येष्ठांची संपुर्ण तपासणी व सल्ला देतील. शिवाय गरजेनुसार पॅनेलवरील सर्व शाखांमधील तज्ञ डॉक्टर्स त्यांच्या हॉस्पिटल/क्लिनीक मध्ये ज्येष्ठांना मोफत तपासतील तसेच गरजेनुसार व आर्थिक परिस्थीती नुसार उपचारांत सवलती दिल्या जाणार आहेत. आज या मोफत तपासणीचा 200 हुन अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला. त्यांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.

या उद्‌घाटन सोहळ्यास सचिव डॉ. महादेव मिठारी,केएमए चे मानद सचिव डॉ. संदीप साळोखेडॉ.अरुण कुलकर्णीडॉ. विद्युत शहा,डॉ. अजित चांदेलकर,डॉ. जयंत वाटवे यांच्या सह कोल्हापूरातील नामवंत डॉक्टर्स,पदाधिकारी व  ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!