News Flash

मोदी सरकार आल्यापासून देशात संघाचा विस्तार वाढला

नागपूर (प्रतिनिधी) : केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नागपूरमध्ये आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या अहवालाद्वारे हा दावा करण्यात आला.
संघाचे महासचिव कृष्ण गोपाल यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, नागालँड, मिझोरम आणि काश्मीरच्या खोऱ्याव्यतिरिक्त देशाच्या सर्वच भागात रा.स्व.संघाचे काम मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. सध्या संपूर्ण देशभरात एकूण ३७ हजार १०९  ठिकाणी ५८ हजार ९७६ शाखा लागत आहेत.
त्यांनी पुढे सांगितलं की, २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार येण्याच्या दोन महिने पूर्वी देशातील २९ हजार ६२४  ठिकाणी ४४  हजार ९८२ शाखा लागत होत्या. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून यात मोठी वाढ झाली. मार्च २०१५  मध्ये ३३ हजार २२३ ठिकाणी ५१ हजार ३३२  शाखा लागण्यास सुरुवत झाली. तर २०१६  मध्ये ३६ हजार ८६७ ठिकाणांवर ५६ हजार ८५९  शाखा लागल्या. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ३६ हजार ७२९  ठिकाणी ५७ हजार १६५  शाखा लागण्यास सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!