News Flash

वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केले : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आम्ही आमच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना पूर्णपणे माफ केले आहे, से सांगताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भावुक झाले. आमच्या वडिलांचा, आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होते,असंही राहुल गांधी म्हणाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जीव घेणाऱ्यांना आपण आणि बहीण प्रियंका गांधी यांनी माफ केल्याचे राहुल गांधी म्हणाले.

अनेक वर्ष आम्ही निराश आणि दुखावलो होतो. पण माहित नाही… आम्ही त्यांना पूर्णपणे.. से म्हणताना राहुल यांचे शब्द अडखळले. सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त करताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला.

राहुल यांनी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव यांच्या हत्येचा उल्लेख केला. एखादी भूमिका घेतल्याबद्दल आपल्या कुटुंबाला किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना होती, से राहुल गांधी म्हणाले. माझी आजी म्हणाली होती की तिचा मृत्यू होणार आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं होते की त्यांचा मृत्यू होणार.असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी १९८४  मध्ये त्यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांना श्रीलंकन तमिळ महिला सुसाईड बॉम्बरने उडवले होते. चेन्नईजवळच्या निवडणूक रॅलीत १९९१ मध्ये ही घटना घडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!