News Flash

उदयनराजेंना भारिप निवडून आणेल : रामदास आठवले

सातारा (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आजही कायम आहे, मोदी कधीच  दलित विरोधी नाहीतखासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी  दिली नाही तर त्यांना रिपाइंचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ असे  प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सातारा येथे केले.

ते म्हणाले की, देशात मोदींची हवा आहे. मोदी प्रामाणिक आहेत. त्यांनी भरपूर कामे केली असून ते दलितविरोधी अजिबात नाही. भाजपमध्ये अनेक बहुजन काम करत आहेत. २०१९ ला केंद्रात सरकार भाजपचेच येणार आहे. फक्त  काही जागा कमी जास्त होतील.

भीमा कोरेगाव प्रकरणात समाजच आंदोलनात उतरला होता. समाजाच्या आंदोलनात आमच्या पक्षाचे कार्यकर्तेही सामील झाले होते. ही प्रकाश आंबेडकर यांची एकटय़ाची लढाई नव्हती. गुन्हे दाखल झाले त्याच्यात  दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते  आणि समाजबांधव आहेत. या आंदोलनात मराठा समाजावर कोणताही  राग नव्हता. गावागावात  मराठा व दलित समाज गुण्यागोविंदाने राहतात व काम करतात. या आंदोलनात मोटार गाडय़ांचे सर्वात जास्त नुकसान झाले.

उदयनराजे आले तर त्यांचे पक्षात स्वागतच आहे. उदयनराजे सक्षम नेते आहेत. तसेच ते माझे चांगले मित्र आहेत.मराठा नेता म्हणून रिपाइंमध्ये त्यांनी यावे तसेच नारायण राणेंनी रिपाइंमध्ये यायला काय हरकत नाही. हे दोन्ही नेते जर रिपाइंमध्ये आले तर राज्याच्या राजकारणात भारिपचा दबदबा व पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भारिप जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, किशोर तपासे, दादा ओव्हाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!