News Flash

शेतकऱ्यांचा मोर्चा सोमवारी विधान भवनावर धडक

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकहून निघालेला किसान मोर्चा विक्रोळी या ठिकाणी हा मोर्चा काही वेळात पोहचेल. त्यानंतर सायन या ठिकाणी असलेल्या सोमय्या मैदानावर हा मोर्चा थांबेल. तिथे जेवण आणि थोडी विश्रांती घेतली जाईल. त्यानंतर आज रविवारी रात्रीच हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोहचण्याची शक्यता आहे.

तर उद्या म्हणजेच सोमवारी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. विनाअट कर्जमाफीची प्रमुख मागणी आणि इतर अनेक मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा हा मोर्चा काढण्यात आला आहे.  

अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा १२ मार्चला विधान भवनावर धडकणार आहे. या मोर्चाला शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. किसानसभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस अजित नवले या सगळ्यांचा या मोर्चात सहभाग आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चेकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

१२ मार्चला २५ ते ३० हजार शेतकरी विधान भवनावर धडकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किसान सभेचा लाल बावटा हाती घेऊन आणि लाल टोपी घालून शेतकरी या मोर्चात सहभागी होत आहेत. त्यामुळे या मोर्चाला लाल वादळच म्हटले जाते आहे. हे लाल वादळ उद्या विधान भवनावर धडकणार आहे. भिवंडीत मुक्कामी असताना या मोर्चातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देऊन, तसेच गाणी गाऊन आणि वाद्ये वाजवून सरकारचा निषेध केला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता हा मोर्चा सुरु आहे. आज हा मोर्चा मुंबईत दाखल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!