News Flash

पोर्ले येथे पुर्णत्व फौंडेशनचा पुरस्कार वितरण संपन्न…

आसुर्ले (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील पुर्णत्व फौंडेशनचा  पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. समाजहितार्थ आदर्श कामगिरी बजावलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा  गौरव करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. काल (शनिवार) सायंकाळी पोर्ले येथील मसाई हॉल येथे हा सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विनय कोरे,अध्यक्ष वारणा उद्योग समूह, परशुराम खुडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, पृथ्वीराज सरनोबत सभापती पंचायत समिती,पन्हाळा उपस्थित होते.

यावेळी डॉ.विनय कोरे यांच्या  हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सचिन चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षण, कला, क्रिडा अशा  विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीस लोकांना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

यावेळी अजित कुंभार, शरद मिसाळ,सचिन चव्हाण, सत्यवान पाटील, जीवन खवरे, सुनील नांगरे-पाटील, उल्हास पाटिल, शहाजी खुडे, नितिन घोरपडे, विशाल पाटील, रविंद्र धडेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!