News Flash

भेसळीच्या निमित्तानं विनाकारण वेठीस धरू नका : कोल्हापूरच्या गूळ उत्पादकांचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भेसळीच्या नावाखाली वेठीस धरून ‘कोल्हापूरी गुळाची बदनामी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नादाला लागू नकाअसा इशारा गूळ उत्पादकांनी अन्न-औषध प्रशासन विभागाला दिला. अन्न-औषध प्रशासन विभागाने आठवड्यापुर्वी बाजार समितीत धाड टाकून नोटीसा दिल्या होत्यात्यामुळे सौदे अस्थिर होऊन दरात घसरण झाली. याबाबत आज (शनिवारी) समितीमध्ये बैठक पार पडली. यावेळी उत्पादकांनी आपल्या संतप्त भावना वव्यक्त केल्या. तर कोल्हापूरी गुळाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट असून आतापर्यंत एकाही सॅँपलमध्ये भेसळ आढळली नसल्याचा खुलासा अन्न आणि औषध प्रश्नाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांनी केला.

भेसळ नाही तर कारवाई कसली करताजाणीवपूर्वक त्रास देणार असाल तर गप्प बसणार नाहीअसा इशारा समितीचे संचालक विलास साठे यांनी दिला. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेतयापुढे समितीत पाय ठेवू नकाअसे सभापती कृष्णात पाटील यांनी सुनावले.यावेळी सहायक आयुक्त केंबळेकर म्हणाले की, हायड्रॉस पावडरचे प्रमाण एक हजार लिटर ला ३५ ग्रॅम हवेपण रंगासाठी पावडर भरमसाठ टाकली जाते. ऊसाच्या वाणातच गोडी कमी असल्याने साखर मिसळली जातेही भेसळ बेकायदेशीर आहे. गेले दोन वर्षात कोल्हापूरातील गूळाची एकाही सॅँपलमध्ये भेसळ आढळलेली नाही. त्यामुळे तुम्ही घाबरू नकापरवाना न घेतल्याने व्यापाऱ्यांना नोटीसा काढल्याचे केंबळकर यांनी सांगितले.

यावेळी उपसभापती अमित कांबळेसचिव मोहन सालपेउपसचिव राजेंद्र मंडलिकसंचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!