News Flash

‘आरएसएस’च्या सहकार्यवाहपदी भैयाजी जोशी यांची चौथ्यांदा निवड ; होसबळे पुन्हा वेटिंगवर

नागपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी आज (शनिवार) दुपारी पत्रकार परिषदेत केली. मात्र या पदाच्या शर्यतीत असलेले दत्तात्रय होसबळे यांना या पदासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

        नागपुरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या घटनेनुसार निवडीची प्रक्रिया झाली, पण सरकार्यवाह पदासाठी दुसरं नाव आलं नाही आणि सर्वांनी भैय्याजी जोशी यांच्या नावाला पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आलीय. २००९ पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता संघाची टीम भागवत- जोशी कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!