News Flash

लोकनेते डॉ. पतंगराव कदम पंचत्वात विलीन…

सांगली (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, लोकनेते, आमदार डॉ. पतंगराव कदम आज (शनिवार) पंचत्वात विलीन झाले. वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात आज सायंकाळी त्यांचे सुपुत्र विश्वजित यांनी मुखाग्नी दिला त्या वेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या जनसागराच्या हृदयाचा बांध फुटला.

मुंबईच्या लीलावती रुग्णालयात पतंगरावांचे कर्करोगाने शुक्रवारी रात्री निधन झाले आणि सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. सर्व राजकीय पक्षात त्यांचे मित्र होते. त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यातील सिंहगड बंगल्यात ठेवण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात राजकीय नेत्यांसह हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. यानंतर दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांचे पार्थिव खास हेलीकॉप्टरने वांगी येथे आणण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांध्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, सतेज पाटील आदी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!