News Flash

भुजबळांच्या तब्येतीला धोका झाला तर ती जबाबदारी सरकारची… : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सुरु असलेल्या उपचारावरून विधानपरिषदेत आरोप-प्रत्यारोप झाले होते. छ्गन भुजबळ यांना योग्य उपचार मिळावेत, त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा राष्ट्रवादीचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्राद्वारे दिला आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी चिंताही व्यक्त केली आहे.

भुजबळ मागील दोन वर्षापासून तुरुंगामध्ये आहेत. या काळामध्ये त्यांच्या तब्येतीवरही परिणाम झाला आहे. ७१ वर्षांच्या भुजबळ यांची प्रकृतीबाबत आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील याची मला खात्री आहे. त्यांना योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशारा शरद पवारांनी सरकारला पत्राद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!