News Flash

तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर नांदगाव समुद्रकिनारी कोसळले ; महिला पायलट गंभीर

रायगड (प्रतिनिधी) : भारतीय तटरक्षक दलाचे गस्तीवर असलेले हेलिकॉप्टर मुरुडजवळच्या नांदगाव येथे समुद्र किनारी कोसळून महिला पायलट गंभीर जखमी झाली. तर इतर तीनजण किरकोळ जखमी झाले. हेलिकॉप्टर उतरवत असताना त्याला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तटरक्षक दलातील हे गस्तीपथकाचे हेलिकॉप्टर असून नेहमीच्या गस्तीवर ते निघाले असताना अपघातग्रस्त झाले. मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील हे घटनास्थळी पोहोचले असून अपघाताची माहिती घेत आहेत. त्याचबरोबर नौदलाचे एक पथकही मदतीसाठी नांदगावला पोहोचले आहे. मुरुड येथील अगदांडा येथे तटरक्षकदलाचा तळ आहे. येथून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. या हेलिकॉप्टरमधून महिला पायलटसह तीन जण प्रवास करीत होते. अपघातात ही महिला पायलट गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारांसाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरने मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!