News Flash

विशाळगडानजीक गेळवडे तलावात राजगोळी खुर्दचे दोन तरुण बुडाले… 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडीतील गेळवडे तलावामध्ये पोह्ण्यासाठी उतरलेले दोन तरुण बुडाल्याचा दुर्दैवी प्रकार आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलाय.  इयाज पीरमहमद बाबर्गी (वय २६) आणि नेहाल मलिक बाबर्गी (वय १८, दोघेही रा. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) अशी त्यांची नावे आहेत.  पोलिसांच्या सूचनेनुसार रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि अथक प्रयत्न करून दोघांचेही मृतदेह दुपारी साडेतीनच्या सुमारास बाहेर काढले. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी राजगोळी खुर्द येथील आठजण विशाळगडला फिरण्यासाठी तवेरा गाडीतून बाहेर पडले होते. सकाळी साडेदहाच्या दरम्यान विशाळगडच्या अलीकडेच असणाऱ्या गेळवडे तलावामध्ये पोहण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. गाडीतील ड्रायव्हरसहीत आठही जण पोहण्यासाठी तलावामध्ये उतरले. पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यातील  एजाज आणि नेहाल यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आलेल्या साथीदारांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. काहीजणांनी याची माहिती तत्काळ शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिली.

शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने मोठ्या परिश्रमाने या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. गेल्या दोन महिन्यांमधील ही तिसरी घटना आहे. या पूर्वी अशाच पद्धतीने बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी गेळवडे ग्रामपंचायतीने पोहण्यास मनाई असल्याबाबतचा फलक लावला असूनही विशाळगडला येणारे पर्यटक येथे जिवावर उदार होऊन पाण्यात उतरत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!