News Flash

आता ५० कोटींवर कर्ज घेणाऱ्यांना द्यावी लागणार पासपोर्टची माहिती…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे १२७०० कोटींच्या घोटाळ्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता ५० कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यांना त्यांचे पासपोर्ट डिटेल्स बँकेला द्यावे लागणार आहेत. अशी व्यक्ती काही घोटाळा करत असल्याची शंका आल्यानंतर बँक संबंधीत यंत्रणांना माहिती देऊन अशा व्यक्तीला विदेशात पळून जाण्यापासून रोखू शकते.

याबाबत अर्थ सचिव राजीव कुमार यांनी ट्विट केले आहे की, बँकिंग व्यवस्था अधिक स्वच्छ आणि जबाबदार करण्यासाठी सरकार नियम अधिकच सक्त करीत आहे. ५० कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला आता बँकेला पासपोर्ट डिटेल्स द्वावे लागतील. यामुळे घोटाळे करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करता येईल. ५० कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या खातेदारांकडून पुढील ४५ दिवसांमध्ये त्यांची पूर्ण माहिती बँकेला मिळाली पाहिजे.

सध्या अशी कोणतीही व्यवस्था नाही ज्या माध्यमातून बँका कर्जदारांकडून त्यांचे पासपोर्ट डिटेल्स मिळवेल. कर्ज ठाक्वून ते फेडण्याची इच्छा नसलेले लोक सध्या देश सोडून जात आहेत. त्यांना थांबवण्यासाठी बँकेकडे कोणतीही यंत्रणा नाही. याशिवाय बँक आणि संबंधीत यंत्रणा यांच्यात माहितीची देवाण-घेवाण होऊन कारवाई होण्यास वेळ लागतो. याच त्रुटीचा फायदा उठवून नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय मल्ल्या, जतिन मेहता यांनी घेतला. कोट्यवधींचे कर्ज बुडवून ते परदेशी फरार झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!