News Flash

व्हॉट्सअॅपची नवीन सुविधा : व्हॉईस रेकॉर्ड झाले सोपे

 

  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातले सर्वात मोठे टेस्ट मेसेजिंग अॅप असलेल्या  व्हॉट्सअॅपने त्याच्या युजर्ससाठी एक सुविधा अपडेट केली आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपवर व्हॉईस रेकॉर्ड करणे सोपे होईल. 

व्हॉट्सअॅप अपडेट लॉक्ड रिकॉर्डिंग हे फिचर घेऊन येत आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स व्हॉईस रेकॉर्ड करु शकतात. यासाठी युजरला व्हॉईस मेसेज पाठवताना रेकॉर्डचे बटन होल्ड करुन ठेवावे लागते. मात्र आता नव्या अपडेटमध्ये संपूर्ण रेकॉर्डींग होईपर्यंत बटन होल्ड करण्याची गरज लागणार नाही. फक्त एकदाच बटण दाबून रेकॉर्डींग सुरु करा आणि संपल्यावर रेकॉर्ड आयकॉनवर क्लिक करा.

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या या फिचरचे सध्या अँड्रॉईडच्या बीट व्हर्जनवर २.१८.७० आणि २.१८.७१ वर टेस्टिंग सुरू आहे. या नव्या अपडेटमुळे व्हॉईस रेकॉर्डचा प्रिव्ह्यू ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे झालेल्या चुका त्वरित लक्षात घेऊन त्यामध्ये सुधारणा करणे शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!