News Flash

भारत, चीनमधील आयात वस्तूंवर जबर करआकारणीचा अमेरिकेचा इशारा

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर भरभक्कम कर लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर या देशांमध्ये मोठा कर लादला जात असल्याबद्दल ट्रम्प यांनी टीका केली.

ट्रम्प प्रशासनानं लोखंडाच्या आयातीवर २५ टक्के आणि अॅल्युमिनियमवर १० टक्के कर लावला आहे. या निर्णयामुळे जागतिक व्यापाराला धक्का बसला असतानाच ट्रम्प यांनी भारत आणि चीनला इशारा दिला आहे. अमेरिकेच्या हर्ले डेव्हिडसन या बाईकवर भारतात असलेल्या ५० टक्के आयात शुल्काचं उदाहरण त्यांनी अनेकदा दिलंय. त्यामुळे भारतीय वस्तूंवर जादा कर लादण्यात येईलअसं ट्रम्प यांनी जाहीर केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!