News Flash

पतंगरावांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात उसळला जनसागर…

पुणे (प्रतिनिधी)  :  शिक्षण, सहकार,राजकारण, समाजकारण या क्षेत्रात ५० हुन अधिक वर्ष काम करून ठसा उमटवलेले लोकनेते पतंगराव कदम यांच्या  अंत्यदर्शनासाठी आज (शनिवार) पुण्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

सिंहगड बंगल्यात सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, प्रणिती शिंदे, कुमार सप्तर्षी,विश्वनाथ कराड,सुधीर गाडगीळ या मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन पतंगराव यांचा मुलगा विश्वजित याचं सांत्वन केलं. निवासस्थानापासून त्यांचे पार्थिव धनकवडी येथील भारती विद्यापीठात सकाळी आज (शनिवार) साडेअकराच्या सुमारास आणण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली. विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनीही साश्रु नयनांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पतंगराव यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना धक्का बसलाय. त्यांच्या आठवणी सांगताना प्रत्येकाला अश्रू अनावर झाले.

कर्करोगाने त्रस्त असलेल्या डॉ. पतंगराव कदम यांचे काल (शुक्रवार) रात्री ९. ५० वा. लीलावती रुग्णालयात निधन झाले. आज दुपारी साडेचारच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.   

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!