News Flash

‘लाईव्ह मराठी’तर्फे रविवारी ‘तुझी माझी जोडी’ कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्पावधीतच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘लाईव्ह मराठी’ या न्यूज पोर्टल आणि इन्फोटेनमेंट चॅनेलतर्फे कोल्हापुरातील रंकाळा पदपथ उद्यानामध्ये ‘तुझी माझी जोडी’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ११ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार असून हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके, नगरसेवक शारंगधर देशमुख  उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘अंतरंग’ तर्फे महेश हिरेमठ आणि सहकाऱ्यांतर्फे रोमँटीक गीते सादर केली जाणार आहेत. त्याचबरोबर खास महिलांसाठी स्पॉट गेमचे आयोजन केले असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास आदर्श भीमा वस्त्रम, परफेक्ट किचन्स – ट्रॉलीज फर्निचर, विप्रास टेक्नोमार्ट, बेस्ट ऑफ प्लेस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील कॉटनकिंग शोरूमच्या समोरील यशोधरा अपार्टमेंटमधील लाईव्ह मराठीच्या मुख्य कार्यालयामध्ये तसेच वरील उल्लेखित शोरूममध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  या कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लाईव्ह मराठी’तर्फे करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!