News Flash

काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. आजच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या लिलावती रुग्णालयात पतंगराव कदम यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्या होत्या.

पतंगराव कदम यांचा जन्म १९४५ साली सांगली जिल्ह्यातल्या सोनसळ या गावी झाला. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी वाटचल करत राजकारणात प्रवेश केला होता.   पतंगराव कदमांनी  महाराष्ट्रातील वनखाते तसेच मदत आणि भूकंप पुनर्वसन मंत्री असे पद भूषविले होते.  तसेच त्यांनी १९६४ साली त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करुन शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले होते.  पतंगराव कदम हे राजकारणात अजातशत्रू म्हणून ओळखले जायचे. डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि कुलगुरु देखील होते. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे यांच्या छत्राखाली देशात आणि परदेशामध्ये १८० शैक्षणिक संस्था असून ही भारतातील नामवंत आणि अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होते.

तसेच डॉ. कदम सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक आहेत. तसेच नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि काँम्पुटर अॅप्लिकेशन्स यांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. 

तसेच कदम यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये  ‘लोकश्री’, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल ‘मानवता सेवा अवॉर्ड’, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्कार, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा ‘एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन’, ‘शहाजीराव पुरस्कार’, तर  कोल्हापुरातील ‘उद्योग भूषण’ पुरस्कार त्यांना मिळाला होता.  डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने काँग्रेस आणि शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!