News Flash

पुण्याच्या लाचखोर डे. कलेक्टरकडे लाखोंची रोकड, दागिने अन् पेट्रोल पंप…

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरेकडे लाखो रुपयांची रोकड, सोने, पेट्रोल पंप आणि पुणे, सोलापूर या शहरांमध्ये फ्लॅट असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना त्याच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडले होते व त्याला अटक केली होती.

त्यानंतर, मोरेच्या पुण्यातील घरात एसीबीने झडती घेतली. त्यात ३८ लाख ३३ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. त्याचबरोबर, सोनं, पेट्रोल पंप आणि पुणे-सोलापूरमध्ये फ्लॅट असल्याची माहिती एसीबीच्या तपासात पुढे आली आहे. नातेवाईकांच्या नावे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जमा केल्याचेही मोरेने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बेनामी मालमत्तांचा शोध एसीबी घेत आहे. श्रीपती मोरे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक अकरा या पदावर कार्यरत होता. जमिनीच्या वादाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मोरेने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पंधरा हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!