News Flash

शासकीय नोकरीसाठी खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत : विभीषण पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खेळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन खेळाडूंनी कामगीरी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी अधिकृत संघटनेच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन शासकीय नोकरी मिळविण्यासाठी खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असे मत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील व्यक्त केले. ते शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे आयोजित सन २०१६-१७ या वर्षातील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य आणि सर्वाधिक ६४० गुण संपादन केल्याबदल न्यू कॉलेजला सन २०१६-१७ मधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून ‘क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’ प्रमुख उपस्थितांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर गुणवंत खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कारजिजामाता राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षकमार्गदर्शक आणि संघटकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विद्यापीठातर्फे दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल. विद्यापीठाच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा विमा उतरविला जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरेन्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडेअमर सासनेकिरण पाटील, डॉ.पी.टी. गायकवाड, जे.एच.इंगळे, डॉ.दीपक पाटील-डांगे, विजय रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!